Thursday, February 3, 2011

बंधन


'वळणावरती' या लघुपटानंतर कधी एकदा पुढची फिल्म करतोय असे झाले होते. पण प्रत्येक गोष्टीचा योग असतो तो जुळून आला कि सर्व काही सोपे होते असेच काही घडले 'बंधन' adfilm करताना.

योगायोग होता तो आज तक साठी adfilm बनविण्याचा. विषय होता 'स्त्री भ्रूण हत्या थांबवा'.
जवळ जवळ सहा महिने उलटून गेल्यावर प्रोटोग फिल्म्स कडून नवी कोरी adfilm बनवण्याची तयारी सुरु झाली. सर्वात मोठा प्रोब्लेम होता तो फिल्म च्या लेन्थ चा कारण फिल्म ची लेन्थ होती फक्त '४० सेकंद'.

' तिच्या जन्मावरच बंधन मग का करता रक्षाबंधन' अशी सोपी आणि सरळ कॉनसेप्ट घेऊन स्क्रिप्ट लिहिली गेली. स्टोरीबोर्ड वर सुद्धा मेहेनत घेतली गेली.

एका रात्री मध्ये बंधन या फिल्म चे शूट पूर्ण झाले. कमीतकमी वेळेत आपला विषय लोकांसमोर ताकदीने मांडणे किती कठीण असते हे या फिल्म वेळी लक्षात आले. हा अनुभव खूप काही देऊन गेला.

हा प्रयोग पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रोटोग टीम मधील प्रत्येकाचा मोलाचा वाटा होता. हि फिल्म सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रोटोग चा मानस आहे. बंधन फिल्म यु ट्यूब ला पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

http://www.youtube.com/watch?v=LGkZn02Ijw8

Tuesday, July 7, 2009

Still photographs of 'Walanawaratee' - marathi short film


Promo of My first film 'Walanawaratee'



बरेच लोक आपले रोजचे सरळ साधे आयुष्य जगण्यात खुश असतात. आपले घर, नोकरी, मित्र हेच त्यांचे जग असते. . . . . आमच्या बाबतीत जरा वेगळेच आहे आमचे जग हे मर्यादित नाही... घरात बसून बाहेरचे जग पहाणे आम्हाला पटत नाही. काहीतरी नविन करण्याची आवड आम्हाला कधीच शांत बसू देत नाही.

www.mandeshi.com आणि www.saswadkar.com या वेबसाइट्स सुरु केल्यानंतर आम्हाला अजुन काहीतरी करायचे होते की ज्या मधुन आजच्या पिढीचा गावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. मग डोक्यात विचारांची चक्रे फिरू लागली, काय करता येईल आणि ते केल्याने आपण काहीतरी साध्य करू का??? ह्या गोष्टीवर भर देण्यात आला. आम्ही प्रत्यक्ष जाउन गावात बदल करणे तर शक्य नाही कारण तेवढी क्षमता आपल्याकडे आता तरी नाही, पण प्रत्यक्ष जाउन बदल करू शकलो नाही तरी विचारात बदल घडवू शकलो तर?? . . .खूप सार्‍या गोष्टीचा विचार करून आम्ही लघुपट करण्याचा विचार केला की ज्या मधून हा संदेश आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकू...


काम सुरू झाले विषय सामजिकच निवडला ... गाव आणि शहर हा मतभेद आणि त्यामुळे खुटलेली प्रगती हा विषय... तसे पाहिले गेले तर शहरात प्रत्येक जण प्रगतीच्यापथावर बेफाम धावत असतो पण त्याच बरोबर तो बर्‍याच गोष्टीना विसरत जातो. गावाकडे प्रगती नसली तरी संस्कृती, मदतीची भावना, श्रद्धा अशा गोष्टी अजूनही जपल्या जातात... शहरी लोक मात्र सर्व विसरून जातात. ते हे देखील विसरतात की आपला जन्म पण अशाच छोट्याशा गावी झाला आहे. तिकडे अनुभवलेले काही क्षण आपल्या मनाच्या कोपर्‍यात कुठे तरी घर करून असतात... आपल्या प्रगतीत गावाचा थोडासा का होईना वाटा आहे असे आपल्याला वाटत असेल तर गावासाठी काहीतरी करता आले पाहिजे... वळणावरती या शॉर्ट फिल्म द्वारे आमचा हाच सांगण्याचा प्रयत्न असेल की तुम्ही सर्व सोडून गावी जाऊ नका पण आपण आपल्या गावासाठी काय करू शकतो याचा फक्त विचार तर करा. . . मार्ग आपोआप मिळेल.

या फिल्मचा विषयच असा होता की तो लोकापर्यंत ताकदीने पोहोचण्यासाठी यात कलाकार पण त्याच ताकदीचे लागणार हे आम्ही जाणून होतो.. त्याच वेळी आम्ही संजय खापरे ना हा विषय ऐकवला त्याना हा विषय इतका आवडला की त्यानी लगेच होकार सांगितला... दुसर्‍या कलाकाराचे नाव त्यानीच आम्हाला सुचवले... त्यासाठी समीर-विजय याला विचारण्यात आले त्याने स्क्रिप्ट ऐकून लगेच होकार कळविला..... त्यानी दिलेले प्रोत्साहन खूप मोठे होते....

सासवड जवळ वाघापुर या गावी फिल्म चे शूटिंग पूर्ण झाले... विक्रम ढेम्बरे आणि निलेश कुंजीर यांची मूळ कथा-संकल्पना तसेच अमर ढेम्बरे , मंगेश डावखर, विश्वनाथ रेड्डी, विक्रम ढेम्बरे आणि निलेश कुंजीर असे निर्माते आणि महेश घाटपांडे यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला वळणावरती हा लघुपट लवकरच प्रदर्शनासाठी सज्ज होईल... देशात तसेच विदेशात हा चित्रपट विविध महोत्सवात दाखविला जाईल